Ad will apear here
Next
साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे गीतमंच सीडीचे वाटप


मालवण :
साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा स्व. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चालू वर्ष ‘प्रकाशवर्ष २०१९’ म्हणून साजरे करीत आहे. या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील ‘कथामाले’शी संलग्न असलेल्या १०० प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गीतमंचाचे सूर उमटविण्यासाठी ‘एक सूर एक ताल’ या सीडीचे वाटप उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या सीडीमध्ये कदम कदम बढाए जा, बलसागर भारत होवो, हम होंगे कामयाब, बहु असोत सुंदर संपन्न की महा, उधळीत शतकिरणा अशा प्रकारची गाणी समाविष्ट आहेत. 



‘प्रकाशवर्ष २०१९’च्या निमित्ताने कथाकथन स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी कथांची पुस्तके लेखन, कथा तंत्र आणि मंत्र मार्गदर्शन, रुग्णांना अन्नदान, निसर्ग निरीक्षण सहल इत्यादी कार्यक्रम मालवण शाखा राबविणार आहे. त्याचे नियोजन २३ जून रोजी झालेल्या कथामाला सहविचार सभेमध्ये करण्यात आले. 



या वेळी माधव गावकर यानी संगीत व जीवनातील आनंद याबाबत आपले विचार मांडले. कथामालेच्या उपक्रमातून साने गुरुजींची विविध गोड गाणी मुलांपर्यंत पोहोचल्यामुळे शाळा-शाळांत ‘एक सूर एक ताल’ नक्कीच पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी कथामालेबरोबरच गीतमंचाचा उपक्रम जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उत्स्फूर्तपणे राबवण्याचे आवाहन केले. 

सभेला कथामालेचे सुमारे ८० सभासद उपस्थित होते. अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी ‘प्रकाशवर्ष २०१९’च्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करून विविध उपक्रम उत्साहाने पार पाडण्याचे आवाहन केले. या वेळी व्यासपीठावर सुगंधा गुरव (केंद्रप्रमुख आचरा), विजय चौकेकर (मुख्याध्यापक, शाळा आंबेरी नं. १), बाबाजी भिसळे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, आचरा), चंद्रशेखर हडप, बबनराव पडवळ आदी कथामाला सदस्य उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZIDCB
Similar Posts
चोखंदळ वाचक स्पर्धेत त्रिवेणी घाडी, यशवंत टिळक विजयी मालवण : वाचनसंस्कृती वाढीस लागावी म्हणून साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी रामेश्वर वाचनमंदिराच्या सहकार्याने चोखंदळ वाचक स्पर्धा आयोजित केली होती. यात युवा वाचक गटात त्रिवेणी मोहन घाडी विजेती ठरली, तर ज्येष्ठ नागरिक गटात यशवंत टिळक विजयी ठरले.
प्रकाशभाई मोहाडीकर जन्मशताब्दी : मालवणमध्ये साने गुरुजी कथामालेचा स्नेहमेळावा आचरा (मालवण, जि. सिंधुदुर्ग) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मालवण तालुक्यातील आचरे गावात कथामाला स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यासोबतच एक मे हा सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना दिन असल्याने या दिवशी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता
मराठी सक्तीची मागणी करणाऱ्या आंदोलनाला ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचा पाठिंबा मालवण : ‘महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत मराठी सक्तीची झालीच पाहिजे,’ या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आहे. २४ जून २०१९ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मराठी संस्थांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक
बॅ. नाथ पै यांच्यासारखे उमदे समाजवादी व्यक्तिमत्त्व दुर्मीळ मालवण : ‘बॅ. नाथ पै यांच्यासारखे उमदे समाजवादी व्यक्तिमत्त्व होणे आता दुर्मीळच आहे. बॅ. नाथ पै प्रथमच मालवण शहरात आले, त्या वेळी आम्ही त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या पहिल्याच भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती,’ अशी आठवण समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूकाका अवसरे यांनी आचरे येथे बॅ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language